आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:राज्यातील बदल्यांच्या रॅकेटबाबत अहवालात औरंगाबादच्या दाेन पाेलिस अधिकाऱ्यांची नावे

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये माेठे रॅकेट सक्रिय असल्याची तक्रार राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुख्य सचिवांकडे केली हाेती. या पत्रात आैरंगाबादचे राहुल खाडेे, गणेश किंद्रे यांच्यासह राज्यातील २९ पाेलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. या रॅकेटचा संशयित मुख्य सूत्रधार महादेव इंगळे हे या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याने या सर्वांची चाैकशी करावी, अशी मागणीही शुक्ला यांनी केली हाेती.

विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कथित भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांकडे सादर केल्यानंतर शुक्ला यांच्या गाेपनीय पत्राच्या प्रतीही समाेर आल्या आहेत. यात म्हटले आहे की, ‘महादेव इंगळे हे वरिष्ठ पाेलिस अधिकारी व नेत्यांच्या नावाचा वापर करुन लाखाे रुपये घेऊन बदल्यांची कामे करत हाेते. त्यामुळे इंगळे यांच्यासह त्यांच्या संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांचे फाेन गुप्तचर विभागाने टॅप केले हाेते. यातून बदल्या, पदाेन्नतीसाठी लाखाे रुपयांचे व्यवहार समाेर आले असून या रॅकेटची चाैकशी करावी,’ अशी मागणी तेव्हा शुक्ला यांनी केली हाेती.

राहूल खाडे, गणेश किंद्रे (आैरंगाबाद), राहुल धस (अंबाजाेगाई), निसार तांबाेळी (डीआयजी- दक्षता अधिकारी, सिडकाे), दिलीप भुजबळ, विजयकुमार मगर, श्रीधर जी. (एसआरपीएफ कमांडंट, नागपूर), शिवाजी राठाेड (ठाणे), राकेश कलासागर (पुणे), दिगंबर प्रधान (ठाणे), अतुल झेंडे (साेलापूर ग्रामीण), संदीप पालवे (उस्मानाबाद), वैशाली कडूकर (साेलापूर), पराग मनेरे (मुंबई), मिलिंद माेहिते (बारामती), राजू भुजबळ (धुळे), अशाेक दुधे (पनवेल), भरत तांगडे (राज्य गुन्हे सुरक्षा), राहुल श्रीरामे (हाेमगार्ड विभाग), मनाेज पाटील (साेलापूर), चंद्रकांत खांडवी (नाशिक), मंगेश चव्हाण (मालेगाव), विवेक पवार (काेल्हापूर), गणेश बिरादार (इचलकरंजी), विकास ताेडावळ (उमरखेड), पंकज सिरसाट (ठाणे), अशाेक वीरकर (सांगली), धुला तेले (उल्हासनगर), हेमंत सावंत (नागपूर).

खाडे- इंगळेंचे जवळचे संबंध
आैरंगाबादचे खाडे यांचे महादेव इंगळे यांच्याशी जवळचे संबंध आहेत, त्यांच्या बदलीसाठी इंगळे प्रयत्नात आहेत. हिंगाेलीचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत यांच्या साेलापूर येथे बदलीसाठी इंगळे यांनी ५० लाख रुपये मागितले हाेते, असेही शुक्ला यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...