आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे-फडणवीस सरकारला अडचणी:बांगर, सुर्वेंचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण पोलिस तपासणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदारांची दादागिरीची भाषा शिंदे-फडणवीस सरकारला मोठ्या अडचणीची ठरत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (16 ऑगस्ट) सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी त्रेधातिरपीट उडाली. पत्रकारांच्या प्रश्नांच्या फैरीमुळे नमत शेवटी मुख्यमंत्र्यांनी ही दोन्ही प्रकरणे पोलिस तपासतील आणि आवश्यकता भासल्यास कारवाई करतील, असे सांगितले.

शिंदे गटाचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी जाहीर सभेत चिथावणीखाेर वक्तव्य केले होते. तसेच हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेच्या महाव्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात तर मोक्का लावला जात होता. धमकीची भाषा कुणीही करू नये. हा प्रकार योग्य नाही. सरकारचे अशा कृत्यांना समर्थन नाही. दोन्ही प्रकरणे पोलिस तपासतील आणि उचित कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घोषणा होऊनही 9 महिने मदत मिळाली नव्हती, असा दावा त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...