आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मदतीचं कौतुक:वडिलांचे छत्र हरपलेल्या चहा विक्रेता सागरला पोलीस शिपायाने केली शैक्षणिक मदत, थेट गृहमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. या काळात डॉक्टरांसह पोलिस हे आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले आहेत. खाकी वर्दितल्या या देवाने अनेकांची मदत केली आहे. याच काळात राज्यातील या पोलिसांच्या कार्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक वेळा कौतुक करत त्यांना ऊर्जा दिली आहे. आता, आणखी एका मुंबई पोलिसाच्या कामाचं गृहमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आलं आहे. 

मुंबईच्या वरळी येथील पोलीस कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ओंकार व्हनमारे यांनी दादर (माटुंगा) येथे एका 14 वर्षीय चहाविक्रेत्या मुलाला शैक्षणिक साहित्य दिले होते. त्याला दहावीचे पुस्तक देऊन त्यांनी मदत केली होती. तसेच, आपला मोबाईल नंबर देऊन, यापुढेही शिक्षणासाठी मदत हवी असेल तर कॉल करा, असेही म्हटले होते. यानंतर थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पोलीस बांधवाच्या कामाचं कौतुक केलं आहे. आल्या ट्विटर अकाऊंटवरुन गृहमंत्र्यानी ओंकार व्हनमारे यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक वाटत असल्याचं ते म्हणाले आहेत.  

अनिल देखमुखांनी लिहिलं की, 'परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते, जिद्द तेव्हाच जन्माला येते. मुंबई पोलीस दलातील  संवेदनशील पोलीस कर्मचारी ओंकार व्हनमारे यांनी काही दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरविलेल्या आणि घरी आजारी असणाऱ्या आईसाठी चहा विकणाऱ्या सागर माने या मुलाला दहावीची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या. भविष्यात शिक्षण घेताना कोणतीही अडचण आल्यास मला संपर्क कर असा विश्वास व्हनमारे यांनी सागरला दिला. मला होतकरू, कष्टाळू व परिस्थितीची जाणीव असणाऱ्या सागरचे आणि त्याला मदत करणाऱ्या व्हनमारे यांचे खूप कौतुक वाटते.' असं म्हणत गृहमंत्र्यांनी पोलिस कर्मचाऱ्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

Advertisement
0