आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवी परीक्षा:मुख्यमंत्र्यांपासून राजभवनापर्यंत रंगले विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे राजकारण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य नाही : सामंत

राज्यातील विद्यापीठांच्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही घेणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जाहीर केले. पदवी परीक्षा रद्द झाल्या आहेत, या निर्णयावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली. ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या परीक्षांबाबत सरकारने एप्रिल महिन्यात एक समिती नेमली. या समितीने ६ मे रोजी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. यात पदवीपूर्व आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याची शिफारस करण्यात आली होती. हा अहवाल राज्य सरकारने ८ मे रोजी स्वीकारला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हवर माहिती दिली की, “यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील.’ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार, असे वातावरण असताना, सामंत यांनी विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली आणि १७ मे रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून, या संकटकाळात विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा घेणे व्यवहार्य ठरणार नसल्याचे मत कळवले. सामंत यांच्या याच पत्रावरून पुढे राजकारण झाले. या पत्रात ते म्हणाले होते, “विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा जुलैमध्ये घेणे कठीण बाब वाटतेय. 

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकणे संयुक्तिक ठरणार नाही.’ विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेड प्रदान करण्याच्या पर्यायाला मान्यता द्यावी, अशी विनंतीही सामंत यांनी आयोगाला पत्रातून केली होती. सामंतांनी लिहिलेल्या या पत्राला २२ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेणे म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे. परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देणे योग्य ठरणार नाही, असे राज्यपालांनी स्पष्ट केले. उदय सामंत यांनी आयोगाला पत्र लिहिण्याआधी राज्यपालांना माहिती दिली नाही, याबद्दलही कोश्यारींनी नाराजी व्यक्त केली. “परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांचा निकाल लावल्यास त्यांच्या पुढील उच्च शिक्षणावर, पदवीधर आणि रोजगारावर परिणाम होईल,” असे मत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केले.

भाजप नेते आशिष शेलार यांचीही टीका

सामंत यांनी स्पष्ट केले की, “कोरोनाची स्थिती, विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबत माझे मत मी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मांडले. हा काही गुन्हा नाही. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी परीक्षा रद्दच्या निर्णयावर सरकारवर टीका केली. तसेच राज्यपालांना निवेदनही दिले. राज्यपाल व शिवसेना आमनेसामने आले तेव्हा शिवसेनेने परीक्षांच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका गोवा, गुजरातमध्ये एक आणि महाराष्ट्रात वेगळी का?’ असा सवाल करत भाजपने घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेतील फरक दाखवून दिला. विद्यापीठांच्या या परीक्षांच्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांनीही उडी घेतली. आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवा सेनेने ९ मे रोजीच पत्रक जारी करत विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. युवा सेनेच्या या मागणीशी काँग्रेसप्रणीत एनएसयूआय पण सहमत आहे.

बातम्या आणखी आहेत...