आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलगीतुरा:समुद्राचा अन् नागपूरचा संबंध नाही : शरद पवार; बारामतीत मला समुद्रदिसला नाही : फडणवीस

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोकणातील निसर्ग चक्रीवादळ नुकसान पाहणी दौऱ्यात रंगला कलगीतुरा

कोकणातील नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादीचे शरद पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला . फडणवीस यांच्या दौऱ्याने सर्वांच्या ज्ञानात भर पडेल, अशी पवारांनी बुधवारी रत्नागिरी येथे फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. त्याला फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या कोकण दाैऱ्यात उत्तर दिले. ते म्हणाले, बारामतीला मी अनेक वेळा गेलो, मला तिथे समुद्र दिसला नाही. मुलगा कितीही पुढे गेला तरी मुलाला काय कळतं असेच बापाला वाटत असते.

समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही : पवार 

ठिकाण : रत्नागिरी (१० जून)

1 पवार : विरोधी पक्षनेते फडणवीस कोकणात येणार असतील तर चांगलंच आहे. त्यांच्या ज्ञानात तेवढीच भर पडेल. शेवटी कोकणात किती नुकसान झालंय हे सर्वांना कळलं पाहिजे. प्रत्येक जण वेगळ्या भागांतून येतो. मी बारामतीच्या दुष्काळी भागातला आहे. ते नागपुरातले आहेत. समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही. त्यामुळं सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. आमच्याही पडते आहे.

2 पवार : राज्यात कोरोनाच्या साथीची भयंकर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेता येतील का याबद्दल काही जाणकारांशी मी चर्चा केली. काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या. त्यानुसार दिल्ली, मुंबई, कानपूर, खरगपूर येथील आयआयटींनीदेखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वोत्तम विद्यापीठ ऑक्सफर्डनंही असाच निर्णय घेतला आहे. ऑक्सफर्डच्या कुलगुरूंपेक्षाही आपल्या आदरणीय राज्यपालांचे ज्ञान अधिक असू शकतं.

3 पवार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणाल्याचे समजले. पण आमच्या सर्कशीत फक्त प्राणीच आहेत. आमच्याकडे विदूषकाची तेवढी कमतरता आहे. राजनाथ िसंह यांनी भाजपच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर तिखट शब्दात टीका केली होती. हे सरकार म्हणजे सर्कस असल्याचे ते म्हणाले होते.

बारामतीत मला समुद्रदिसला नाही : फडणवीस

ठिकाण : अलिबाग (दि. ११)

1 फडणवीस : मी विदर्भातला आहे त्यामुळे समुद्राशी काहीही संबंध नाही. मी अनेकदा बारामतीत गेलो तिथे मला समुद्र दिसला नाही. शरद पवार माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. कदाचित माझ्या खांद्यावरून त्यांना वांद्र्याच्या सीनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर निशाणा साधायचा असेल. तुम्ही काही तरी करा असं सांगायचं असेल.

2 फडणवीस : राज्य सरकार राज्यपालांना डावलू शकत नाही. सरकारने कमिटी नेमली होती. त्यांची भूमिका महत्त्वाची असताना मंत्री घोषणा करतात. मंत्र्यांना माहिती आहे का, त्यांच्याकडे कोणते अधिकार आहेत? कोणती परीक्षा होणार, कोणती होणार नाही. इंजिनिअर, मेडिकल परीक्षा होणार. मग कोणत्या परीक्षा होणार नाहीत ?

3 फडणवीस : सर्कशीत पहिले प्राणी होते. पण आता फक्त जोकर राहिले आहेत. हे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना माहिती होतं. त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला सर्कस संबोधलं. राज्यात पहिल्यांदा सरकार विरुद्ध सचिव असं चित्र आहे. आपल्या मंत्र्यांचे ऐका, सचिवांचं ऐका, समन्वय करा हे सांगणे मुख्यमंत्र्यांचे काम आहे का? मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड मजबूत नाही. कोकण दौरा संपल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांना अहवाल सादर करणार अाहे.

शरद पवार यांनी घेतली ठाकरेंची भेट

निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी खास आर्थिक पॅकेज देणे गरजेचे असून त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी भेटून केली.

सरकारच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी

श्रीवर्धन | कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवंेद्र फडणवीस म्हणाले की, वादळ येऊन ९ दिवस झाले. पण, कोकणात राज्य सरकारची कोणतीही मदत अद्याप पोहोचलेली नाही. राज्य सरकारने कोकणासाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत.

बातम्या आणखी आहेत...