आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:1166 ग्रामपंचायतसाठी 13 ऑक्टो.ला मतदान

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी (७ सप्टेंबर) दिली.

समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होईल.

बातम्या आणखी आहेत...