आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा चव्हाण प्रकरणी धक्कादायक खुलासा:5 कोटी रुपये देऊन पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचे तोंड बंद केले, पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही दिशाभूल करत आहेत -आजी
  • पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही दिशाभूल करत आहेत -आजी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पूजाच्या चुलत आजींनी धक्कादायक खुलासा केला आहे. “शिवसेना आमदार संजय राठोड यांनी 5 कोटी रुपये देऊन पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांचे तोंड बंद केले. त्यामुळेच पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत.” असा गौप्यस्फोट पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीच पूजाच्या आजीचा हा व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओमध्ये शांता राठोड पुढे म्हणाल्या, "पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासून आवाज उठवत आहे. पूजाचे आई-वडील काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई-वडिलांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई-वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत नाही. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याराविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. याप्रकरणात आतापर्यंत बंजारा समाजाची दिशाभूल झाली आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही दिशाभूल करत आहेत."

तृप्ती देसाई दबाव आणत असल्याचा आरोप
तृप्ती देसाई दबाव आणत असल्याचा आरोप

संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे आणि पूजाचे पालक कधीच तोंड उघडणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.

पालकांनी रविवारी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिले. हे पत्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. या पत्रात त्यांनी आमची बदनामी होत असल्याचे म्हटले होते. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत, असे पूजाच्या आई-वडिलांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...