आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राठोडांचे पाय खोलात !:पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती

बंजारा समाजातील 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड अडचणीत आले. आता राठोडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार संबंधित तरुणी आणि राठोड यांनी अनेकदा एकमेकांना फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासामधून समोर आली आहे.

या प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झाले असल्याची माहिती आहे. या सर्व संभाषणाची रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागली असल्याची माहिती आहे. पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण 90 मिनिटांचे असल्याची माहिती आहे.

मूळची बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. या आत्महत्ये नंतर एकच गदारोळ निर्माण झाला. आत्महत्येसाठी शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरले जात आहे. या कारणामुळे त्यांना 28 फेब्रुवारीला वनमंत्रीपदाचा राजीनामादेखील द्यावा लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...