आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी बोलणाऱ्या भाजप नेत्यांना धमक्या; चित्रा वाघ, अतुल भातखळकर यांना आले धमकीचे फोन

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलाही एखादा फोन करा, मग पाहतो : नितेश राणे

बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी राज्यात वादळ उठले असून विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपने ठाकरे सरकारमधील विदर्भातील थेट एका मंत्र्याचे नाव घेतले आहे. परिणामी भाजपच्या काही नेत्यांना धमकीचे फोन येत असल्याचा दावा सोमवारी करण्यात आला आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर कथित ध्वनिचित्रफिती सध्या चर्चेत आल्या आहेत. यात ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाव घेऊन आरोप केला आहे होता. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे पत्रही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे मला कालपासून धमक्यांचे फोन येत आहेत,’ असा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. “ठाकरे सरकार आल्यापासून राज्यात झुंडशाही बळावली आहे. धमक्यांना बधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,’ असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

मला धमक्या देऊन वेळ वाया घालवू नका : चित्रा वाघ
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे म्हटले आहे. धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगा मला फोन करून वेळ वाया घालवू नका, माझ्या भावड्यांनो. जिथे जिथे महिलांवर अन्याय-अत्याचार होणार, तिथे तिथे नडणार आणि भिडणारच, असे वाघ यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे.

आम्ही संघाच्या मुशीत तयार : प्रवीण दरेकर
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सरकार दडपशाहीने काम करत आहे. चित्रा वाघ आणि अतुल भातखळकर यांना धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही. आमचे कार्यकर्ते संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

मलाही एखादा फोन करा, मग पाहतो : नितेश राणे
पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहेत. एखादा कॉल मलाही टाका. मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे तो. वाट बघतो आहे, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. भाजपने पूजा आत्महत्याप्रकरणी शिवसेनवर हल्ला चढवला आहे.