आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी बातमी:...अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा, पूजा चव्हाण प्रकरणामुळे सापडले होते अडचणीत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवासांपासून विरोधीपक्षाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिला आहे.

काय म्हणाले संजय राठोड?

संजय राठोड यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. याविषयावर बोलताना राठोड म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून मला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न विरोधीपक्षाकडून केला जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझ्यावर आरोप लावले जात आहे. पण चौकशी सुरू आहे, या चौकशीमध्ये सर्व सत्य समोर येईल. चौकशी निपक्षपणे व्हायला हवी ' असे संजय राठोड म्हणाले आहेत.

भाजपने घेतली होती आक्रमक भूमिका

विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर आहे. दरम्यान अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपने संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत राठोड यांच्यावर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर वनमंत्री सापडले अडचणीत
बीड जिल्ह्यातील परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली होती. या तरुणीच्या आत्महत्येस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारातील वनमंत्री संजय राठोड जबाबादार असल्याचा आरोप होत होता. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...