आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची आक्रमक भूमिका:पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी; महिला कार्यकर्त्यांनी केली आंदोलने, अनेक जण ताब्यात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या महिला मोर्चाने राज्यातील विविध शहरांमध्ये शनिवारी आंदोलने केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. भाजपच्या महिला मोर्चाने राज्यातील विविध शहरांमध्ये शनिवारी आंदोलने केली. मुलुंड टोल नाका, बीड, औरंगाबाद, नागपूर, जालना, पुणे आणि ठाण्यामध्ये ही आंदोलने झाले. अनेक ठिकाणांवर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर बसून चक्काजाम केला आहे. मुंबई आणि बीडमध्ये झालेल्या आंदोलनांदरम्यान महिला कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली, ज्यानंतर अनेक महिलांना ताब्यात घेतले आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा भाजपकडून देण्यात आलेला आहे. सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. शुक्रवारी विधान परिषेदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एखाद्या समाजाच्या दबावात येण्याऐवजी राठोड यांचा राजीनामा घ्यावा.

1 आणि 3 मार्च रोजी निदर्शनेही होणार आहेत
मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, असे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले. त्यांना थोडीशी लाज वाटत असल्यास त्यांनी राजीनामा द्यावा. पाटील म्हणाले की, 1 मार्च रोजी युवा मोर्चाच्या वतीने राठोड यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले की, 3 मार्च रोजी ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाईल.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यापासून सातत्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशेषतः भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळतेय. राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यात आघाडीवर आहेत. आज देखील भाजपकडून ठिकठिकाणी राठोड यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या संपूर्ण घडामोडींविषयी संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पूजाच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.

बातम्या आणखी आहेत...