आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण:वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलाच नाही? केवळ राजीनामा घेऊन शिवसेनेची राजकीय खेळी?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.

वनमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावरुन अडचणीत सापडले आहे. त्यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र त्यानंतर हा राजीनामा अद्यापही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचे वृत्त आहे. हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे गेलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा देऊन तीन दिवस उलटले आहेत. तरीही संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत. केवळ राजीनामा घेऊन शिवसेनेने राजकीय खेळी तर केली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषेदत या विषयावर भाष्य केले होते. राजीनामा स्वीकारला की नाही? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राजीनामा दिला तो फ्रेम करायला नाही, तो स्विकारला आहे'. मात्र असे असतानाही हा राजीनामा अद्यापही मुख्यमंत्र्यांच्याच खिशात असल्याचे वृत्त आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली होती. या तरुणीच्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारातील वनमंत्री संजय राठोड जबाबादार असल्याचा आरोप होत होता. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...