आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी केस:तुरुंगात असलेल्या राज कुंद्राच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात आज सुनावणी, एक दिवसापूर्वी दाखल केले 1500 पानांचे पुरवणी आरोपपत्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात असलेल्या राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. त्याला आधी 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती, तर कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो सतत तुरुंगात आहे. सत्र न्यायालयाने कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शर्लिन चोप्रापासून पूनम पांडेने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. हे प्रकरण मुंबई सायबर पोलिसांकडे वर्ष २०२० मध्ये नोंदवण्यात आले होते.

राज कुंद्रासह त्याचे आयटी प्रमुख रायन थारप यांच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्जावर मुंबई पोलिसांकडून उत्तरही मागितले होते. दरम्यान, बुधवारी मुंबई पोलिसांनी कुंद्रासह 11 आरोपींविरोधात 1500 पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. अभिनेता शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. या आरोपपत्रानंतर कुंद्राच्या जामिनाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. मात्र, मुंबई पोलिस कुंद्राच्या जामिनाला विरोध करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सत्र न्यायालयाने यापूर्वीच जामीन अर्ज फेटाळला आहे
यापूर्वी 28 जुलै रोजी किल्ला न्यायालयाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळली होती. फिर्यादी पक्षाच्या या युक्तिवादावर न्यायालय समाधानी होते की, त्याच्या सुटकेनंतर राज कुंद्रा या प्रकरणात तपास आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. राज कुंद्रा पावरफुल असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. तो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. अशा परिस्थितीत जर त्याची सुटका झाली तर तो साक्षीदार आणि तपास या दोन्ही गोष्टींवर प्रभाव टाकू शकतो. तो पुरावा नष्ट करू शकतो. पोलिसांनी न्यायालयाला असेही सांगितले की त्यांच्याकडे राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे आहेत आणि गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयातून 68 प्रौढ व्हिडिओ जप्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...