आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध:मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये रस्त्यावर चिटकवण्यात आले पोस्टर, संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारला विचारले - हे तुमच्या राज्यात काय सुरू आहे?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान का?' असा सवाल संबित पात्रा यांनी विचारला आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमानुएल मॅक्रोद्वारे पैगंबर मोहम्मद साहब यांच्या वादग्रस्त कार्टून दाखवण्याच्या निर्णयाचा बचाव करणे आणि इस्लामविषयी वादग्रस्त टीका करण्यामुळे नाराज असलेल्या लोकांनी मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये अनोख्या पद्धतीने विरोध केला. येथील प्रमुख रस्त्यांवर राष्ट्राध्यक्ष इमानुएल मॅक्रों यांचे 100 पेक्षा जास्त पोस्टर चिटकवण्यात आले. ज्यावरुन गाड्या जात आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये रस्त्यावर रांगेत पोस्टर चिटकवण्यात आले आहेत. यावरुन गाड्या जात आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत संबित पात्राने लिहिले की, 'महाराष्ट्र सरकार, हे तुमच्या राज्यात काय सुरू आहे? भारत आज फ्रान्ससोबत उभा आहे. जो जिहाद फ्रान्समध्ये होत आहे, त्या दहशतवादाविरोधात भारताच्या पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत मिळून लढा देण्याची प्रतिज्ञा केली आहे. मग मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान का?' असा सवाल संबित पात्रा यांनी विचारला आहे.

भोपाळमध्येही झाले असेच आंदोलन
अशाच प्रकारे पोस्टर आंदोलन भोपाळच्या रस्त्यांवरही गुरुवारी झाली. येथे इकबाल मैदानमध्ये अनेक हजार लोकांनी जमा होऊन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधा घोषणाबाजी केली. यानंतर गर्दी जमा करणाऱ्या मध्य विधानसभा क्षेत्राचे आमदार आरिफ मसूद आणि त्यांचे 2000 पेक्षा जास्त समर्थकांविरोधात पोलिसांनी कलेक्टरच्याय आदेशाचे उल्लंघन केल्याची केस दाखल केली.