आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटीलिया प्रकरण:ठाण्याच्या व्यापाऱ्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला; जवळपास 10 तास पाण्यात होता मृतदेह, चेहरा आणि पाठीवर जखमेच्या खुणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 फेब्रुवारीला मनसुख यांचा मृतदेह ठाण्याजवळील कळवा खाडीत सापडला होता.

ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा प्रारंभिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. मनसुख यांचा मृतदेह सुमारे 10 तास पाण्यात पडलेला आढळून आला आहे. चेहऱ्यावर आणि पाठीवरही जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. मनसुख यांचा व्हिसेरा तपासण्यासाठी कलिनाच्या फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवला आहे. हा तपशील अहवाल मिळाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील.

5 फेब्रुवारीला मनसुख यांचा मृतदेह ठाण्याजवळील कळवा खाडीत सापडला होता. पोलिसांनी आत्महत्या केल्याचे सांगितले होते, परंतु कुटुंबीयांनी ते नाकारले. मनसुख गेल्या काही दिवसांपासून जी कार चालवत होते, ती कार 25 फेब्रुवारीला अँटीलियामधून 200 मीटरच्या अंतरावर संशयित परिस्थितीत आढळली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकी देणारे पत्र आढळले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यासंबंधीतकाही प्रश्नची उत्तरे वाचा...

प्रारंभिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय मिळाले?
मनसुख यांच्या प्रारंभिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये चेहरा आणि डोळ्यांवर जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. पाठीवर दोन ठिकाणी जखमा आहेत. जखम कधी आणि कशा झाल्या याचा उल्लेख रिपोर्टमध्ये नाही. तसेच काही अधिकृत वक्तव्यही नाही.

मनसुख यांच्या मृत्यूची वेळ काय होती
रिपोर्टवरुन समजले आहे की, मृतदेह मिळण्याच्या 12-13 तासांपूर्वी मनसुख यांचा मृत्यू झाला होता. तारीख आणि वेळेचा उल्लेख नाही. मनसुख यांच्या मृतदेह पाण्यात 8-10 तास बुडून होता. कलिनाच्या फॉरेंसिक सायंसेस लेबोरेट्री येथून मनसुख यांचा व्हिसेरा रिपोर्ट येण्यास कमीत कमी 15 दिवसांचा कालावधी लागेल.

चेहऱ्यावर रुमाल होते, रिपोर्टमध्ये याचा उल्लेख आहे का?
चेहऱ्यावर रुमालांविषयी कोणतेही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही तसेच पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही याचा उल्लेख नाही.

प्रारंभिक पोस्टमॉर्टम अहवाल एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचला का?
नाही. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम अहवालात आपले मत राखून ठेवले आहे. डॉक्टर सध्या केमिकल एनालिस्टच्या अहवालाची प्रतीक्षा करतील, म्हणजेच फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील.

बातम्या आणखी आहेत...