आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:वैद्यकीयच्या परीक्षांना स्थगिती द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले अाहे.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमडी आणि एमएसच्या परीक्षा ३० जुलैच्या आधी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले अाहे. भारत सरकारने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला डिसेंबर २०२० पर्यंत परीक्षा स्थगित करण्यास सांगावे अशी मागणी केली आहे. ठाकरे यांनी म्हटले, देशात सध्या कोरोना महामारीचं संकट गडद होताना दिसत आहे.

यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या संकटाचा सामना करण्यात सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी आघाडीवर आहेत. अंतिम वर्षातील एमडी एमएसचे अनेक विद्यार्थी निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या कोविड -१९ रुग्णांवर उपचारासाठी तसेच क्लिनिकल व्यवस्थापनास मदत करण्यात आघाडीवर आहेत. जर त्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या तर या महत्त्वाच्या काळात प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता भासेल. केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार, प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम २०१९ वगळून उन्हाळी २०२० वैद्यकीय परीक्षा १५ जुलैपासून घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. तसेच ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे, त्या परीक्षा घेण्याबाबत कोविड प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...