आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधत एमपीएससीच्या परीक्षांविषयी महत्त्वाची मागणी केली आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे दोन दिवसांनी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी,' अशी विनंती राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला घेतली जाणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र यावेळी विद्यार्थ्यांची भूमिका बदलली आहे. यावेळची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा केली.
'एमपीएससीची तयारी करणारे राज्यातील काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागणार आहे. यामुळे वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे भीतीची स्थिती आहे,' असे मत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे मांडले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसले तरी त्यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.