आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पवारांची मुलाखत:'सत्ता ही विनयाने वापरायची असते', शरद पवार यांची जोरदार मुलाखत, राऊतांनी शेअर केला तिसरा टीझर 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातल्या विरोधीपक्षाला आपण काय सल्ला द्याल असा प्रश्नही संजय राऊतांनी पवारांना विचारला आहे.
Advertisement
Advertisement

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. सामना वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमातून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून मुलाखतीचे टीझर शेअर करत आहेत. आजही त्यांनी एक टीझर शेअर केला आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते असे शरद पवार यामध्ये म्हणत आहेत. 

उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नसल्याचं शरद पवार या मुलाखतीच्या टीझरमध्ये म्हणताना दिसत आहेत. तर ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत अशा मथळ्याखाली ही मुलाखतीचा टीझर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पवारांनी काही वक्तव्य केली आहेत. 'उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही ' असं शरद पवार म्हणाले. तसंच राज्यात सत्ताकेंद्र एकच असलं पाहिजे असंही शरद पवारांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या विरोधीपक्षाला आपण काय सल्ला द्याल असा प्रश्नही संजय राऊतांनी पवारांना विचारला आहे. 

Advertisement
0