आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाचे संकट कायम:मंत्रीमंडळ बैठकीतच वीज गुल! ओबीसी प्रश्नावरील चर्चा अर्धवट, वीज समस्येचा झटका राज्य सरकारलाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मंत्रीमंडळ बैठक सुरु असतानाच अचानक वीज गेली, त्यामुळे ओबीसी प्रश्नावरील चर्चा बैठकीतअर्धवटच झाली असून राज्यात भारनियमनाचा फटका बसत असताना मंत्रालयालाही आज वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोठा फटका बसला आहे.

राज्यात वीजेचे संकट कायम आहे, कोळशाच्या पुरवठ्यात अनियमितता आणि रेल्वेकडून न मिळणारे रॅक यामुळे कोळसा वेळेवर मिळत नाही. याचमुळे वीजनिर्मितीला मोठे अडथळे येत आहेत. वीजेची राज्यात मागणी वाढतीच असताना प्रत्यक्षात वीजनिर्मिती कमी होत आहे. त्यामुळे भारनियमनाचे संकट आहे. अघोषीत भारनियमन राज्यात आहे. त्यामुळे जनतेला वारंवार मोठा फटका बसला. असे असतानाच आता राज्य सरकारलाही वीज प्रश्नाचा फटका बसला आहे.

आज मंत्रीमंडळात राज्यातील ओबीसींच्या प्रश्नावर बैठक घेतली गेली. बैठक सुरु असतानाच अचानक वीज गेली. यामुळे वीज पुरवठाही खंडीत झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचीही मोठी अडचण झाली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच हा प्रकार घडला त्यामुळे संपुर्ण बैठकच थांबवावी लागली आणि ओबीसी प्रश्नावरील बैठक काही वेळ थांबवण्यात आली होती. जनतेसोबतच राज्य कारभार चालवणाऱ्यांनाही वीज प्रश्नाचा फटका बसतो आहे पण त्यावर अजूनही आशादायक तोडगा निघालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...