आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:जनतेने ठरवले तर शक्तिशाली व्यक्ती टिकत नसतात; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणीचे माजी आ. गव्हाणेंसह भाजप, वंचितचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

भाजप विशिष्ट विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला पक्ष असून आज याच पक्षाच्या हाती देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरवल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले.

परभणीचे माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह वर्धा, नांदेड, पुणे येथील अनेक भाजप, वंचित आणि रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.१३) शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, आज लोक हळुहळु या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील चित्र पाहिले तर एक दिवस असा जात नाही, भाजपमधील लोक पक्ष सोडून गेले. भाजप पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे. परभणीचे विजय गव्हाणे चुकीच्या विचारांकडे गेले होते. ते आता राष्ट्रवादीत आले आहेत. गव्हाणे हे आता अनेकांचे मनपरिवर्तन करून त्यांना राष्ट्रवादीत आणतील. परिणामी, सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल, असेही ते म्हणाले.

नांदेड, वर्धा, पैठणमधील पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश
आज भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा होत आहे. म्हणून अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊ इच्छित आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विजय गव्हाणे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक पदाधिकारी पक्षात येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. परभणी येथील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील रिपाइं नेते प्रदीप साठे, श्रध्दा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...