आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरणात एनआयएचा खुलासा:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हा मनसुखच्या हत्येचा मास्टरमाईंड होता, पुरावे नष्ट करण्यासाठी घेतले होते 45 लाख रुपये

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अँटिलिया' जवळील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरातून स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ जप्त आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी NIA ने मोठा खुलासा केला आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने दावा केला आहे की या संपूर्ण खेळाचा मास्टरमाईंड माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा होता. शर्माच्या सांगण्यावरूनच सचिन वझे याने हा कट रचला आणि मनसुखची हत्या करून मनसख यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत फेकून देण्यात आले.

एनआयएच्या आरोपपत्रानुसार मनसुखला अँटिलिया प्रकरणातील सर्व गुपिते माहीत होती. प्रदीप शर्माने त्याला या प्रकरणात मध्यस्ती ठेवले होते. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले. शर्मा यांनी या प्रकरणातील इतर आरोपींसोबत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत अनेक बैठका घेतल्या, ज्यामध्ये मनसुखच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मनसुखच्या हत्येनंतर अँटिलिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वझे याने प्रदीप शर्माला 45 लाख रुपये दिले होते, जे त्याने हिरेनची हत्या करणाऱ्या काही लोकांमध्ये वाटले होते.

शर्मा यांच्या जामीन अर्जाला करण्यात आला विरोध
शर्मा यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना एनआयएने असेही म्हटले की शर्मा निर्दोष नाहीत आणि त्यांनी गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्ये केल्याचा आरोप केला आहे. न्यायमूर्ती ए.एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या खंडपीठाने याचिकेवर पुढील सुनावणीसाठी 17 मे ची तारीख निश्चित केली आहे. एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की प्रदीप शर्मा एका टोळीचा सदस्य होता, ज्याने अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा कट रचला होता.

अशा झाला मनसुख खुन प्रकणाचा खुलासा
25 फेब्रुवारी 2021 रोजी, मुकेश अंबानींच्या निवासस्थानी, अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक SUV सापडली. एसयूव्ही मनसुख हिरेन यांची होती, जो गेल्या वर्षी 5 मार्च 2021 रोजी ठाण्याजवळ एका खाडीत (लहान नदी) मृतावस्थेत सापडला होता. मनसुख सत्य समोर आणणार नाही, अशी भीती शर्मा यांना वाटत होती, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

मनसुखने खरे सांगितले असते तर शर्मा आणि वाजे यांच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असत्या. माजी 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' शर्मा यांना NIA ने 17 जून 2021 रोजी अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. एनआयएनुसार शर्मा आणि इतर आरोपींनी यूपीए अंतर्गत गुन्हे केले आहेत.

शर्माला अटक करण्यापूर्वी एनआयएनची त्यांच्या घरावर पडली होती रेड
अटकेपूर्वी शर्माच्या अंधेरी पूर्व येथील भगवान भवन अपार्टमेंटमध्ये रेड टाकण्यात आली होती आणि शर्मा यांची येथे अनेक तास चौकशीही करण्यात आली होती. सचिन वझे शर्मा यांना आपला गुरू मानत. त्यांच्या आदेशानुसारच काम केले, असेही सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएने शर्माचा मोबाईल फोन, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले असून मनसुखच्या मारेकऱ्यांना पैसे हस्तांतरित केल्याचा पुरावा सापडला आहे. शर्मा यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आणि अँटिलिया प्रकरणातील कटात सहभागाचा आरोप आहे.

प्रदीप शर्मा यांच्याविरोधात एनआयएला मिळाले पुरावे
एजन्सीने म्हटले आहे की जमा केलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की प्रदीप शर्मा या गुन्ह्यात सक्रियपणे सहभागी होते आणि त्यांनी कट रचणे, दहशतवादी कृत्य, दहशतवादी टोळीचे सदस्य, अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करणे असे गुन्हे केले आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, मनसुखने अँटिलिया घटनेची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आली.

विनायक शिंदे हा पण शर्मा यांच्या होता जवळचा
मनसुख हिरेन खून प्रकरणात अटक झालेला माजी हवालदार विनायक शिंदे हाही शर्मा यांच्या जवळचा आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले शर्मा हे ठाण्यातील खंडणी विरोधी कक्षात कार्यरत आहेत. 90 च्या दशकात त्याचा मुंबई क्राइम ब्रँचच्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. अंडरवर्ल्डचा नायनाट करण्याची जबाबदारी या टीमवर सोपवण्यात आली होती. येथूनच शर्मा एन्काउंटर स्पेशालिस्ट बनले.

बातम्या आणखी आहेत...