आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांना सल्ला:कोरोना मृत्यू दर शून्यावर आणणे अशक्य , उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका; अॅड प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे होणारा मृत्यू दर शून्यावर आणू, असा दावा केला आहे. मात्र ते शक्य नसून मुख्यमंत्र्यांनी खुदा बनू नये. त्यापेक्षा जिथे जिथे लाॅकडाऊन आहे. तो उठवावा आणि जनतेला रोजगारासाठी बाहेर पडू द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. भारतीय लोक कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे राज्य सरकारने यापुढे तरी किमान लॉकडाऊन वाढवू नये. भारतात ४० टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने सांगितले होते. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही अॅड. आंबेडकर म्हणाले कोराेना बाधीतांवरील उपचार चालूच राहतील. पण शासनाला विनंती आहे की, राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला त्यांनी लागावे. जनेतला कामावर जाण्याची मुभा दिल्यास त्यांचा रोजगार वाचेल. तरच माणसे जगतील अन्यथा उपासमारीने मरतील. असा इशारा अॅड. आंबेडकर यांनी दिला. तसेच राज्यात यापुढे कोणत्याही जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे