आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत अनेक दिवसांपासून वंचित आणि शिवसेनेच्या युतीचे भिजत घोंगडे असून उभय पक्षात काही मुद्द्यांवर स्पष्टता झाली असली तरीही भिमशक्ती - शिवशक्ती युतीला आता मोठा अडसर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीच राष्ट्रवादीचा थेट तर काॅंग्रेसचा आमच्या युतीला छुपा विरोध असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युतीला सध्या तरी खीळ बसलेली दिसून येत आहे.
आज माध्यमांशी मुंबईत युतीच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त करीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा अडसर जाहीर केला.
नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, युतीसाठी आम्हाला काॅंग्रेसचा छुपा आणि राष्ट्रवादीचा थेट विरोध आहे. शिवसेना आणि आमच्यातच बोलणी सुरू आहे. आम्ही एकमेकांना आश्वासित केले की, आगामी महानगर पालिका निवडणुकीत एकत्र लढायचे. पुढे निवडणुका आल्यातरी एकत्रच लढत आहे. आमची बोलणी झाली आहे.
आमचा विरोध नाहीच
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सेनेचा प्रयत्न हा आहे की, काॅंग्रेस आणि एनसीपी यांनाही सोबत घ्यायला हवे. त्यावर आमचा विरोध नाही हे आम्ही त्यांना कळवले परंतु अंतर्गत माहीती अशी समजली की, काॅंग्रेसचा आम्हाला छुपा आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आम्हाला उघड पाठींबा आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांच्यासंबंधित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. तेव्हा दोघांनीही युती करण्यास अनुकुल असे भाष्य केले होते. त्यानंतर पत्रकार परिषदते खुद्द प्रकाश आंबेडकरांनीही आपले स्पष्ट मत व्यक्त केले. त्यामुळे या दोन पक्षांत युती कधी होणार याची वाटही लोक पाहत होते.
पुढे काय?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.