आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकीत:शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले - त्यांचे पुस्तक हे पोझिशनचा भाग

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीवरून देशातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान कर्नाटकातील निवडणूकीत भाजपचा पराभव झाल्यास दिल्लीत जागा मोकळी होईल.'' त्यामुळे सगळे आपापली पोझिशन घेऊन बसले आहेत असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तकही याचाच भाग असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजप जर हरली तर दिल्लीतली पोस्टही मोकळी होते. तेव्हा सर्वजण आपापली पोझिशन करून बसले आहेत असे मी पाहतो. हे पुस्तकही एका पोझिशनचा भाग आहे. मी याकडे बघतो असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले. यानंतर या पुस्तकात त्या - त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांच्याकडून भाष्य करण्यात आले आहे. त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल देखील या पुस्तकात भाष्य केले आहे.

काय म्हटले पुस्तकात?

2019मध्ये राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं. २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,' अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता.

काही मिनिटांतच मी सावरलो

'महाविकास आघाडी'चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच एक- दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं.

भाजपचा रडीचा डाव होता

‘महाविकास आघाडी'चा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,' असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं.