आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राम मंदिराचा लढा अखेर संपला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होणार आहे. देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्या नगरी नटली आहे. दरम्यान राम मंदिराच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आंबेडकर यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही आक्षेप नोंदवला आहे.
राम मंदिर उभारणीच्या निर्णयावरच प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवलं आहे. ते म्हणाले की, आज संपूर्ण जग भारतीयांना संशयाच्या नजरेने पाहत आहे. आपल्याला वाटत की, ते द्वेष करत आहेत. मात्र, सत्य परिस्थिती ही आहे की, येथील वैदिक धर्म मानणारे हे अन्य धर्मांवर अतिक्रमण करत आहेत. सध्या अयोध्येतही तेच होत आहे. इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांनीही म्हटलेलं आहे की, अयोध्येत प्राचीन बौद्ध शिक्षा केंद्र आहे.' असे ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.
'अलहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्खननामध्ये तिथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. असे असतानाही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून तथ्याच्या उलट निकाल दिला. भावनांच्या आधारावर राम मंदिर बांधण्याचा निर्णय देण्यात आला आहे. तथ्यांच्या आधारावर निर्णय झाला असता, तर जगानं संशय घेतला नसता. असे न केल्यामुळे जगभरात भारत व भारतीयांची प्रतिमा मलिन झाली असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.