आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपालांची उचलबांगडी करण्याची गरज नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही, मी त्याचं समर्थन करतो, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थ केले आहे.
राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे. मराठी नेतृत्वाने इतके वर्ष सत्ता गाजवली. पण, मराठी माणसाच्या हातामध्ये व्यव्हार देऊ शकले नाही. राज्यापालांनी डोळे उघडले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला इशाला दिला. बुजगावण्याबरोबर राहायचे की नवे नेतृत्व उभे करायचे याचा विचार मराठी माणसाने करावा, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, राज्यात दोघेजण वक्तव्य करतात. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे राज्यापाल कोश्यारी. यातील फडणवीस यांचे कोणतही वक्तव्य हे स्वत:साठी असते त्यामुळे पक्षासाठी कुणी वक्तव्य करणारं असं महाराष्ट्रात नाही. त्यामुळे ती भूमिका राज्यपाल करत आहेत.
काय म्हणाले राज्यपाल?
महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.