आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटी-गाठी:प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, गेल्या 15 दिवसांमधील ही तिसरी भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी राष्ट्र मंचाच्या नेत्यांची बैठक झाली.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या भेटीगाठी सुरू आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याचे वृत्त आहे. गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी भेट आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी राष्ट्र मंचाच्या नेत्यांची बैठक झाली. या भेटीनंतर किशोर हे पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्क लावले जात आहेत. पवारांच्या मनात नेमके काय सुरू आहे याचे अंदाज बांधले जात आहेत. सध्या शरद पवार दिल्लीत आहेत. प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांतील तिसरी भेट आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आहेत. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे काही तरी घडवण्यासाठी ते प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर आणि पवारांची भेट झाली होती. ही भेट राजकीय नसल्याचे पवारांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या वारंवार होत असलेल्या भेटींमुळे या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होत आहे. नवीन राजकीय धोरण आखले जात आहेत का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...