आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत किशोर जाणार 'मन्नत'वर:शरद पवारांनंतर प्रशांत किशोर शाहरुख खानची घेणार भेट, आपल्या आयुष्यावर वेब सीरीजविषयी चर्चा करण्याची शक्यता

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत मीटिंग केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटल्यानंतर रणनितीकार प्रशांत किशोर थोड्याच वेळात अभिनेता शाहरुख खानची त्याचे घर मन्नत येथे जाणून भेट घेणार आहेत. सूत्रांनुसार, शाहरुख प्रशांत किशोरच्या आयुष्यावर वेब सीरीज बनवू इच्छितो. ही देखील चर्चा आहे की, प्रशांत यांना वाटते की, त्यांची भूमिका शाहरुख खाननेच साकारावी. यामुळे आज दोघे मिळून यावर निर्णय घेऊ शकतील.

निवडणूक रणनितीकारच्या रपात प्रशांत किशोर यांचे करिअर खूप चांगले राहिले आहे. त्यांच्या रणनितीमुळे अनेक मोठ-मोठ्या पक्षांना निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, जनग मोहन रेड्डी, कॅप्टन अमरिंदर सिंह, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून काम केले आहे. त्यांच्या रणनितीवर सर्वांना विश्वास आहे. यामुळे असे मानले जात आहे की, जर त्यांच्या आयुष्यावर एखादा चित्रपट किंवा वेब सीरीज बनली तर ती लोकांसाठी खूप इंट्रेस्टिंग राहील.

शरद पवारांची घेतली भेट
शुक्रवारी प्रशांत किशोर यांनी एनसीपी प्रमुख शरद पवारांसोबत मीटिंग केली. असे बोलले जात आहे की, दोघांमध्ये चार तास मीटिंग चालली. शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली. प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. दरम्यान अजित पवारांनी ही बैठक राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...