आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:ईडीने तिसऱ्यांदा प्रताप सरनाईकांना पाठवला समन, चौकशीसाठी 10 डिसेंबरला मुंबईच्या ऑफिसमध्ये बोलावले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रताप सरनाईक दोन वेळा कोविड नियमांचा हवाला देत हजर राहिले नव्हते.

175 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्रवर्तन संचालनालयाने तिसर्‍यांदा समन्स पाठवून ईडी कार्यालयात बोलावले आहे. ईडीने 24 नोव्हेंबरला 10 ठिकाणी छापेमारी केली होती. ज्यामध्ये मुंबई आणि ठाण्यात सरनाईक, यांच्या संबंधीतांच्या घर आणि कार्यालयांचा समावेश होता. सूत्रांनुसार, ईडीला टॉप सिक्योरिटी ग्रुप आणि प्रताप यांच्यात अनेक संशयास्पद पुरावे मिळाले आहेत. ईडीला या प्रकरणी चौकशी करायची आहे.

यापूर्वी दोन वेळा ते कोविड नियमांचा हवाला देत हजर राहिले नव्हते. ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईकांच्या विरोधातही तपास सुरू आहे.

प्रताप सरनाईकांना पुत्रासोबतच चौकशीसाठी जायचे आहे
प्रताप सरनाईकांनी विनंती केली होती की, त्यांना आणि त्यांच्या व्यावसायीक मुलाला एकत्र चौकशीसाठी बोलावण्यात यावे. त्यांनी म्हटले होते की, त्यांच्या सून (विहंग यांच्या पत्नी) यांना हाय ब्लड प्रेशरसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा अनेक गोष्टी सांगत सरनाईक यांनी चौकशीसाठी एक आठवड्यांचा कालावधी मागितला होता.

175 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा काय आहे?
खरं तर, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे कंपनीचे प्रमोटर राहुल नंदा आणि इतरांविरुद्ध टॉप्स ग्रुपच्या माजी कर्मचार्‍यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या FIR च्या आधारे ईडीने इंफोर्समेंट केस इंफर्मेशन रिपोर्ट दाखल केला आहे. यावर्षी 28 ऑक्टोबरला दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार टॉप्स समूहाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (MMRDA) 175 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

MMRDA च्या ठिकाणांवर सुरक्षारक्षक नेमण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुपला प्राप्त झाले आहे. असा आरोप केला जातो की नंदा यांचा जुना मित्र सरनाईक यांनी त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट देण्यास मदत केली आहे. टॉपर्स ग्रुपच्या माध्यमातून सरनाईकच्या कंपन्यांनी परदेशात पैसे पाठवल्याचा संशयही आहे. UK मध्ये केलेल्या गुंतवणूकीमुळे आणि मॉरिशसमधील ट्रस्टमुळे नंदा देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची गडबड केली नसल्याचे म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser