आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची कारवाई:संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाला ईडीने केली अटक, जमीन घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली कारवाई

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली आहे.

प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. एचडीआयएलमधील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी प्रवीण राऊतांसंबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली. यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. अनेक तास त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीकडून राऊतांना अटक करण्यात आली.

यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये प्रवीण राऊतांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊतांच्या पत्नीचे नाव देखील यापूर्वी चर्चेत आले आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांचे जवळचे संबंध आहेत. माधुरी यांनी 2010 मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी करण्यात आला होता.

कोण आहेत प्रविण राऊत?
प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबासोबत देखील त्यांचे संबंध आहेत. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपले असल्याचे आरोप ईडीने त्यांच्यावर केला आहे. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होते. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊतांचे एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.

बातम्या आणखी आहेत...