आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामपंचायत निवडणूक:निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रविण दरेकर (फाइल फोटो) - Divya Marathi
प्रविण दरेकर (फाइल फोटो)
  • सत्ता आणि पैशाच्या जोरावर ग्रामीण पातळीवरील राजकारण बदलण्यावर सरकारचा भर, दरेकरांचा आरोप

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचाची निवड करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला. मात्र यावरून आता राजकारण तापले आहे. विधानपरिषदेचे निरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.

सरकारचे सर्व निर्णय राजकीय हेतूने प्रेरित

प्रविण दरेकर म्हणाले की, सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. सरकारचे सर्व निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असतात. या सरकारकडून जनतेसाठी असलेले निर्णय बदलले जातात. एपीएमसीचा निर्णय असो किंवा नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय प्रत्येक निर्णय या सरकारने बदलला आहे. सत्ता आणि पैशाच्या बळावर ग्रामीण पातळीवरील राजकारण बदलण्यावर सरकारचा भर असल्याचा आरोप त्यांनी केला.

घोडेबाजार करणारेच घोडेबाजाराबद्दल बोलत आहेत

दरम्यान सरपंचपदासाठी होणार घोडेबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. यावरून घोडेबाजार करणारेच घोडेबाजाराबद्दल बोलत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. सरपंचपदाचे आरक्षण आधी काढले काय आणि नंतर काढले काय? काय फरक पडणार आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser