आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Pravin Darekar Critizsize To Ajit Pawar | Fadnavis Government Is Competent, Opposition Should Not Worry Us; People's Work Should Be Done Instead Of Criticizing

पवारांच्या टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर:म्हणाले, शिंदे - फडणवीस सरकार सक्षम, विरोधकांनी आमची चिंता करू नये

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे-फडणवीस सरकार सक्षम असून, विरोधकांनी आमची चिंता करू नये. टीका करण्यापेक्षा जनतेची कामे करावी, जितकी कामे अडीच वर्षांत तुम्ही केली, तितकी आम्ही अवघ्या एका महिन्यात केली, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना अधिकाऱ्यांचे अधिकार काढण्यात आले होते. अधिकाऱ्यांचे अधिकार मंत्र्यांकडे देण्यात आले होते. परंतु शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने लोकांची कामे थांबू नये म्हणून सचिवांकडे दिलेले अधिकार योग्य असल्याचे दरेकर म्हणाले.

हा निर्णय योग्य

महाराष्ट्रात नवीन सरकार येऊन 36 दिवस उलटले. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाज रखडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनात सर्व फायली तुंबल्या आहेत. हे ध्यानात घेता मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच असलेल्या राज्य सरकारने घेतला आहे, त्यावर दरेकरांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

आताच प्रश्न निर्माण झालेत का?

अजित पवार अडीच वर्ष सत्तेत उपमुख्यमंत्री होते. एक महिन्यातच त्यांना प्रश्न निर्माण झाले आहेत का? तुम्ही अडीच वर्षांत किती प्रश्न सोडवली. त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडावे. आम्ही देखील शिंदे-फडणवीस सरकारने काय केले याचा लेखाजोखा मांडू त्यासाठी आम्हाला खूप वेळ आहे. आम्ही राज्यातील सर्व प्रश्न संवेदनशीलतेने घेऊ आणि त्याची सोडवणूक करू, अजित पवारांनी त्याची चिंता करू नये, असा सल्ला देखील दरेकरांनी यावेळी दिला.

काय म्हणाले होते अजितदादा?

लवकरच... लवकरच... लवकरच... हेच शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या तोंडातून निघतात. होईल... होईल... होईल... असे ते सांगत असतात. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे, वेगवेगळी संकट येतात, अनेक घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत, पालकांसमोर अनेक अडचणी आहेत, विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत, निर्णय कोण घेणार, असा सवाल देखील अजित पवारांनी केला आहे.

हे पुरू शकतात?

आम्ही दोघे आहोत... आम्ही दोघे आहोत... असे शिंदे-फडणवीस म्हणतात पण हे दोघे महाराष्ट्राला पुरू शकतात का? याचे तरी आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे. वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने याचा फटका राज्याला बसत आहे, तरी देखील त्यांना त्याचा भान राहिलेला नाही, अशी टीकाही पवारांनी यावेळी शिंदे-फडणवीसांवर केली.

बातम्या आणखी आहेत...