आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात भाजपने उडी मारली आहे. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला होता. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खंजीर खुपसल्याच्याही गुदगुल्या होत असून एकीकडे खंजीर खुपसला, असे म्हणायचे व दुसरीकडे मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसायचे. याशिवाय हे दुसरे काही करू शकत नाहीत, असा टोला नाना पटोलोंनी दरेकरांनी लगावला आहे. तसेच जर हिंम्मत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. पण तसे ते करणार नाहीत. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशातला हा प्रकार आहे, असे म्हणत त्यांनी दरेकरांनी हल्लाबोल केला.
फार काळ सत्तेची मस्ती चालणार नाही -
राज्याच्या इतिहासात कोणत्याच सरकारने खोट्या केसेस दाखल करणे, अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे अशा अतिरेकी कारवाया केलेल्या नाहीत. भाजपचे नेते व कार्यकर्त्यांवर तर रोज शेकडोंच्या संख्येने कारवाया होत आहेत आणि आता भोंग्यासाठी, हिंदुत्वासाठी आंदोलन केले म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांचा एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे तपास सुरु आहे.
सरकारला हे सर्व शोभा देणारे नाही. मस्तवाल झालेल्या या सरकारने अक्षरश: राज्यात हैदोस घातला आहे. आमच्या हातात सत्ता आहे, म्हणून आम्ही काहीही करु शकतो असा अहंभाव त्यांच्यात आलेला आहे. परंतु फार काळ सत्तेची मस्ती चालणार नाही, त्यामुळे सूडाचे राजकारण हे आपल्यावरही उलटू शकते, अशा शब्दात दरेकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
सरकार योग्य कारवाई करेल -
राजद्रोहाच्या कायद्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राजद्रोहाच्या गुन्ह्याच्यासंदर्भात विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे खरंच राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे की, त्याचा गैरवापर होत आहे, अशा चर्चा आता समोर येत आहेत. यावर सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचे कलम लावणे योग्य ठरणार नाही असे नमूद करीत या कलमाला स्थगिती दिलेली आहे. तेव्हा सरकार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भविष्यात योग्य ती कारवाई करेल.
काय म्हणाले नाना पटोले?
मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. आम्ही जयंत पाटील व प्रफुल पटेल यांच्या बोलल्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.