आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या राजकारणाला दिशादर्शक ठरणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. निकालापूर्वीच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रत्येक पक्ष आपापली खेळी खेळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या गोटातूनही काही सावध हालचाली होत असल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला रवाना झाले आहेत.
आमदार प्रवीण दरेकर हे आता जरी भाजपचा महत्त्वाचा चेहरा आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असले तरी ते पूर्वाश्रमीचे मनसैनिक आहेत. मनसे सोडल्यानंतर प्रवीण दरेकर आज पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. प्रवीण दरेकर हे शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगितले जात असले तरी सत्तासंघर्षाचा निकाल येण्याआधी ही भेट होत असल्याने राजकीय चर्चांना मात्र भलतेच उधाण आले आहे.
निर्णय विरोधात लागला तर काय?
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार का, शिंदे सरकार राहणार की जाणार, मुख्यमंत्री बदल होणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आजच्या निकालातून मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची 16 आमदारांवर टांगती तलवार आहेत. त्यात स्वतः मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांचा नावाचा समावेश आहे. निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर काय? याबाबत शिवसेना -भाजप रणनीती आखत असल्याचेही बोलले जात आहे.
चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्माण झालेली जवळीक सर्वश्रुत आहे. एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जात सदिच्छा भेट घेतली होती. राज ठाकरेंनी देखील विकासकामांसंदर्भात एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे. याआधी राज ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार का या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे दरेकर आणि राज ठाकरेंच्या आजच्या भेटीसंदर्भात राजकीय गोटात चर्चा रंगल्या आहेत.
संबंधित वृत्त
सत्तांतर होणार का?:शिंदे सरकार राहणार की जाणार; थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, साऱ्या देशाचे लागले लक्ष
देशाच्या राजकारणाला दिशादर्शक ठरणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या निकालाचे वाचन करणार असून, तो जनतेला लाइव्ह याची देही याची डोळा पाहता येईल. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.