आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचे संजय राऊतांना थेट आव्हान:महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाली असून, त्यांनी पुन्हा गरळ ओकण्याचा प्रयत्न केला; पत्रकार परिषदेत प्रविण दरेकरांची टीका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर नेहमी आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. त्यानंतर आज पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला.

भाजप हा उपऱ्यांचा पक्ष असल्याची खोटक टीका राऊतांनी केली. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर यावर देखील त्यांनी भाष्य केले. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारची नाचक्की होत असून, स्वत: शरद पवारांना त्याच त्या विषयांसाठी पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. संजय राऊत यांनी पुन्हा गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसांची चर्चा करून ईडी, सीबीआय यंत्रणांच्या गैरवापराची ढोलकी वाजवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतो आहे.' असे म्हणत दरेकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

कलम 370 हटवूनही जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही, असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले होते. त्यावर देखील दरेकरांनी भाष्य केले. 'एकीकडे ते म्हणतात कलम 370 हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे. मग ते कलम काढलं ही चूक झाली का? तुम्ही जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेची काळजी करू नका. देशाचे गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. चीनी आक्रमण, काश्मीरची सुरक्षा, सर्जिकल स्ट्राईकसारखी टोकाची कारवाई करण्याची धमक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे' असे म्हणत दरेकरांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, राऊत यांनी किरीट सोमय्यांवर देखील टीका केली होती. किरीट सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मिर फिरत बसतील. शरद पवारांविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख केला हे शोभते का? काश्मिरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोला. त्यांना दम द्या आम्हाला शहाणपणा शिकवू नका. महाविकास आघाडीतील नेत्यांनी नुसती खुर्च्यावर बसू नका' असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...