आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमानवीय:तीन रुग्णालयांनी भरती करण्यास नकार दिला, चौथ्या रुग्णालयात जाईपर्यंत गरोदर महिलेचा वाटेतच मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आस्मा मेहंदी नावाच्या 26 वर्षीय गरोदर महिलेचा झाला मृत्यू
  • भाजप नेते राम कदम यांनी घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला

ठाण्ण्यातील मुंब्रामध्ये उपचाराविना एका गरोदर महिलेचा ऑटोमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चौकशीत समोर आले की, महिलेला तीन रुग्णालयांनी भरती करण्यास नकार दिला होता. या घटनेचा व्हिडिओ भाजप नेते राम कदम यांनी आपल्या ट्विटरवर शेअर करत गंभीर आरोप लावले आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी तिन्ही रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली.

घटना 25-26 मे दरम्यान रात्री घडली. यात आस्मा मेहंदी नावाच्या 26 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झाला. भाजप नेते राम कदम यांनी घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहीले,"मुंब्रामध्ये एक गरोदर महिला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात चक्कर मारत असताना, ऑटोमध्येच तिचा मृत्यू झाला."

वेळेवर उपचार न मिळाल्याचा कुटुंबियांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, आस्माला 25 मे च्या रात्री प्रसव वेदना सुरू झाल्या. कुटुंबीय तिला घेऊन रुग्णालयाकडे धावले. तीन रुग्णालयांनी तिला भरती करण्यास नकार दिला. चौथ्या रुग्णालयाकडे जाताना रस्त्यातच ऑटोमध्ये महिलेचा मृत्यू झाला.

0