आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर अज्ञातांकडून तोडफोड, आरोपींना अटक करण्याची सर्व स्तरातून मागणी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल - गृहमंत्र्यांचे आश्वासन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. घराच्या काचांवर देखील दगडफेक करण्यात आली असून कुंड्यांचेही मोठे झाले आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांनी घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी दिले आहेत. आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागमी सर्व स्तरातून होत आहे. 

राजगृहाचे ऐतिहासिक महत्त्व

मुंबईतील दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. 

‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण, शांतता राखावी

  दरम्यान, “राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...