आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाची तयारी:BMC 6 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण, प्रथम 80 हजार लोकांना लसी दिली जाईल; मुंबईत 8 रूग्णालये बनली लसीकरण केंद्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, चालक, बेस्ट कर्मचारी यांनी सर्वप्रथम लस दिली जाणार

मुंबईसह संपूर्ण राज्यातील शहरी भागात आज रात्री 11 वाजेपासून नाइट कर्फ्यू लावण्यात येणार आहे. या दरम्यान BMCने कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. सोमवारी बीएमसीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. BMC ने लसीकरणासाठी रुग्णालयांना सेंटर बनवले आहे. यामध्ये कूपर रुग्णालयाला आदर्श सेंटरच्या रुपात विकसित केले जात आहे.

6,182 कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

BMC ने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईत 6, 182 कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याची योजना आखली आहे. सोमवारी जवळपास 70 मास्टर प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

या 8 रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार

बीएमसीने लसीकरण केंद्राच्या रुपात KEM, नायर, सायन, कूपर, बांद्रा स्थित भाभा, सांताक्रुज स्थित VN देसाई, रजवाडी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांचा समावेश आहे. बीएमसीने कांजुरमार्गमध्ये यापूर्वी लसीचा कोल्ड स्टोरेज तयार केला आहे. कोविन पोर्टलवर सुमारे 80,000 लोकांचा डेटा अपलोड केला गेला आहे. एकूण 1 लाख 26 हजार 378 लोकांचा डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कूपर हॉस्पिटलला बनवले जाणार आदर्श सेंटर

विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय लसीकरणासाठी एक आदर्श केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. इतर केंद्रे अशा प्रकारे तयार केली जातील. 8 डिसेंबर 2020 रोजी केंद्र सरकारसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे प्रदान केलेल्या माहितीनुसार, (हेल्थ केअर वर्कर्स) डेटा बेस कोव्हिन डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला आहे.

मुंबईत या लोकांना प्रथम लस मिळेल

मुंबईत सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, चालक, बेस्ट कर्मचारी, स्मशानभूमीत काम करणारे लोक आणि इतरांना लसीकरण केले जाणार आहे. सामान्य नागरिकांमध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि कोरोनामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना प्राधान्य दिले जाईल. यांचा डेटा 25 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser