आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा निर्णय झाला असून शिवसेना मुंबईत जितक्या जागा सोडेल त्यावर तयार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मंगळवारी वंचितच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.वंचित बहुजन आघाडीची अडवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीच्या चाव्या दाबू शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठी ते प्रयत्न करतील, असे आंबेडकर म्हणाले.
मुंबई मनपाची स्थिती
मुंबई पालिकेत एकूण २२७ नगरसेवक असून ठाकरे गटाकडे ९३ नगरसेवक होते. १९९५ पासून शिवसेनेने मुंबईत भाजपबरोबर युतीत पालिका निवडणुक लढवली आहे. २०१७ च्या निवडणुकीत मुंबईत वंचितचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.