आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार आज सोमवार 2 जानेवारी असून, पौष महिन्यातील एकादशी तिथी आहे, पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी....
देशभरातील धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील धार्मिक स्थळांवर भाविकांनी गर्दी केली होती. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, वाराणसीच्या अस्सी घाट, उज्जेनमधील महाकाल मंदिर याठिकाणी सकाळच्या आरतीपासून वर्षाची सुरुवात झाली. देशभरात कोरोनाचे सावट असतानाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
भाजपच्या ‘मिशन 144’ चा दुसरा टप्पा सुरू
भाजपच्या “मिशन 144’ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातून हाेणार आहे. चंद्रपुरात नड्डा यांची जाहीर सभा पार पडणारे. त्यानंतर सायंकाळी ते औरंगाबादमध्ये दाखल होतील. मिशन 144 अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील 16 मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. वाचा सविस्तर वृत्त
आजपासून टी-20 मालिका रंगणार
भारतीय संघ घरच्या मैदानावर टी-20 मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात हाेत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हे दाेन्ही संघ सलामीच्या सामन्यात समाेरासमाेर असतील. यादरम्यान श्रीलंका संघ गत सात वर्षांपासून भारतामध्ये टी-20 सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आजपासून भारत श्रीलंका यांच्यात रंजक सामने पाहायला मिळणार.
वाचा सविस्तर वृत्त
सम्मेद शिखरला 'पर्यटनस्थळ' बनवण्यास विरोध
झारखंडमधील सम्मेद शिखरजी या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने घोषित केले. त्यानंतर संपूर्ण देशभरातील जैनसमाजबांधवांनी त्याला विरोध दर्शविला. तसेच दिवसेंदिवस हा विरोध वाढतच चालला आहे. रविवारी या मागणीसाठी देशभरात लोक रस्त्यावर उतरले होते. मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये रविवारी सकाळपासून येथील जैनसमाजबांधवांनी निदर्शने केली.
किरीट सोमय्यांची रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केलीये. 19 बंगल्याप्रकरणी सोमय्या यांनी रविवारी रेवदंडा पोलिस ठाण्यात ही तक्रार केलीये. यासाठी स्वतः किरीट सोमय्या रेवदंडा पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची शकयता आहे.
वाचा सविस्तर वृत्त
आता पाहुयात आज दिवसभरात कशावर आपली नजर असणार ते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.