आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शैक्षणिक:नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्याची तयारी, मार्गदर्शक तत्त्व तयार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा सुरू करण्यासाठी असे आहे नियाेजन

कोरोनामुळे राज्यातील शाळा नियोजित वेळेत सुरू होऊ शकल्या नाहीत. पण, आता जुलैपासून शाळा सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना संबंधित गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होतील, जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथे नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्याची तयारी आहे. सरसकट शाळा सुरू होणार नाहीत, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी, पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले.

शाळा सुरू करण्यासाठी असे आहे नियाेजन
विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड वर्ग भरवण्याचीही मुभा, शाळा सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक, प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट, शिक्षक-विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची अट, शिक्षण विभागाचे हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

0