आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:राष्ट्रपती पदक प्राप्त पोलिस अधिकाऱ्याने मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप न केल्यास 15 ऑगस्टला कुटुंबाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल

एका राष्ट्रपती पदक विजेत्या उपनिरीक्षकाने दोन वर्षे बदलीसाठी वारंवार अर्ज केल्यानंतरही डावलले गेल्यामुळे सरकारकडे कुटुंबासह आत्महत्येची परवानगी मागितल्याचे समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या राकेश साळुंखे या अधिकाऱ्याच्या या मागणीवरून पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मुंबईत २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या वेळी या अधिकाऱ्याने बचाव कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांनी जखमी अवस्थेतही ट्रॅकवर लोकांना जीवनदान दिले होते. ५ जणांना जीवनदान देणाऱ्या या अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक जीवन रक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या दुखापतीवर ते १४ वर्षांपासूनन मणक्यांच्या आजारावर उपचार घेत आहेत. २०१६ मध्ये त्यांची अमरावतीला आणि नंतर औरंगाबादला बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या उपचारातही खंड पडला. त्यानंतर राकेश यांनी असंख्य अर्ज केले आणि वरिष्ठांच्या असंख्य भेटीगाठी घेतल्यानंतरही त्यांना मुंबईत बदली देण्यात आली नाही. मुंबईत उपचारासाठी घ्यावी लागणारी बिनपगारी रजा, उपचारांवर होणारा खर्च, औरंगाबादेत आणि मुंबईत परिवारासाठीचा खर्च या सगळ्यांचा ताळमेळ बांधताना ते त्रस्त झाले आहेत. नियमानुसार बदली होणे अपेक्षित असतानाही आपला विचार केला गेला नाही म्हणून त्यांनी थेट वरिष्ठांकडेच आत्महत्येची परवानगी मागितली. पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. या सगळ्या मानसिक त्रासाचा बळी त्यांचे कुटुंब ठरतेय. त्यांच्या २० वर्षांच्या मुलाने या सगळ्याचा ताण असह्य होऊन दोनदा आपला जीव देण्याचाही प्रयत्न केला.

नियमात बसत असताना, मुंबईत बदलीसाठी ४० जागा असतानाही राकेशचा विचार का होत नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे. आता यात मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप नाही केला तर १५ ऑगस्टला कुटुंबाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...