आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे काही आमदार मुंबईत नाही. विधान परिषद निवडणुकीनंतर काल रात्री काही आमदारांशी संपर्क होत नाही हे सत्य आहे. पण आता त्या आमदारांशी संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमज असल्याने त्यांना नेण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे देखील मुंबईच्या बाहेर असून, त्यांच्याशी देखील संपर्क झालेला आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, ज्या प्रकारचे राजकीय चित्र राज्यात निर्माण करण्यात येत आहे. त्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. ते आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू, आम्ही सर्व आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला जात आहोत.
सर्वजण संपर्कात
पुढे ते म्हणाले की, आज सकाळपासून राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसचे नेत, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार हे सगळे एकमेकांच्या संपर्कात आहे. महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे उद्धव ठाकरेंचे सरकार पाडावे अशा प्रकारची हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, भाजपचा मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपचे प्रयत्न सुरू असून, त्यांना महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असेही राऊत म्हणाले.
छातीवर नाही, पाठीवर घाव
भाजपचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी कालच्या विधान परिषद निवडणुकीनंतर मुंबईवर ताबा मिळण्याची भाषा केली. त्यांचे पाऊलं कोणत्या दिशेने पडत आहे हे समजून घ्यायला पाहिजे. मुंबईत ताबा मिळवण्यासाठी शिवसेनेत फाटाफूट करण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू आहे. याचे भाकीत यापूर्वीही आम्ही केलेले आहे. शिवसेनेमध्ये आईचा दुध विकणारी औलात निर्माण होणार नाही. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वत:ला विकणारे, महाराष्ट्राच्या पाठिंत खंजीर खुपसणारी औलात शिवसेनेत कधीच निर्माण होणार नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी भाजपवर केली.
भाजपने केली व्यवस्था
पुढे राऊत म्हणाले की, माध्यमांमध्ये ज्या आमदारांचे नाव समोर येत आहेत. त्यातले बरेच आमदार वर्षा बंगल्यावर आहेत. गुलाबराव पाटील, संजय राठोड, प्रताप सरनाईक अनेक आमदार वर्षावर आहेत. काही आमदारांशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचे असे म्हणणे आहे की, आम्हाला काय झाले ते कळत नाही पण आम्हाला येथे आणण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आर.सी पाटील यांनी सुरतमध्ये त्यांची व्यवस्था केली आहे, असे राऊत म्हणाले.
ईडीने मुहूर्त साधला
पुढे राऊत म्हणाले, दबाव आणण्याचे प्रकार आपल्याला माहित आहेत.आजचा मुहूर्त साधून ईडीने अनिल परब यांना बोलावले आहे. एकनाथ शिंदेशी संपर्क झाला आहे. गैरसमज असतील तर दूर करू. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. काही मतांचे हिशेब लागत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.