आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा भाजपवर थेट आरोप:म्हणाले- केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीमध्ये भाजपचे लोक भेटले होते, त्यांनी मला सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या लोकांना ते टार्गेट करत आहे. त्यांना टाईट केले जात आहे. एकतर आम्ही काही आमदार फोडून सरकार पाडू किंवा राष्ट्रपती राजवट लागू करू, असा इशारा दिला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, संजय राऊत म्हणाले की, माझ्यासारख्या राज्यसभा सदस्याला केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक का त्रास देत आहेत, असा प्रश्न करून त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपचे काही प्रमुख लोक मला भेटले. वारंवार मला हेच सांगितले की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचे. आमची सगळी तयारी झाली आहे. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटले हे कसे शक्यय? याच्यावर त्यांनी सांगितलं की, तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपकडून निर्घृणपणे राजकारण सुरुये
बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला झुकू नका, असे सांगितले. मी त्यांना नाही म्हटले म्हणून माझ्या आणि नातेवाईकांच्या घरी छापा टाकला. त्यांनी जे आरोप केले आहेत ते खोटे आहेत. माझे मुले, नातेवाईक, मित्रपरिवार प्रत्येकाला बदनाम करायचे. मुलांना फोन करुन ईडी घडी येते, वडिलांना अटक करुन घेऊन जातील, असे सांगितले जाते. इतके निर्घृणपणे राजकारण भाजपकडून सुरु आहे." असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...