आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाराजी नाट्य:विधान परिषदेसाठी दबावतंत्र; बाळासाहेब थोरात, चव्हाण आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसला कमकुवत समजू नये : अशोक चव्हाण

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे ज्येष्ठ मंत्री सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सरकारमध्ये आपला योग्य सन्मान राखला जात नसल्याबाबतची नाराजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्यक्त करणार आहेत.

विधान परिषदेच्या १२ जागांच्या निवडीच्या तोंडावर काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी म्हणजे विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भातले दबावतंत्र आहे, असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ४४ आमदार असलेल्या काँग्रेसला सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळते आहे. मात्र, काँग्रेसचा खरा रोख मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याविरुद्ध आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांसाठी पसंतीचे सचिव मिळत नाहीत हे त्यांचे मूळ दुखणे आहे.

काँग्रेसला कमकुवत समजू नये : अशोक चव्हाण

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी नुकताच आरोप केला आहे. भाजपला दूर ठेवणे काँग्रेसचे प्राधान्य होते, मात्र त्यास कुणी काँग्रेसला कमकुवत समजू नये, असा इशारा चव्हाणांनी दिला आहे. प्रशासन आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत सत्तेत सहभागी असलेल्या घटक पक्षाकडून नाराजी उघड करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

बातम्या आणखी आहेत...