आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत आज मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. आज मध्यरात्रीपासून पीएनजी 5 रुपयांनी तर सीएनजी 7 रुपयांनी महाग होणार असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे. सुधारित दरानुसार सीएनजी गॅसची किंमत 67 रुपये प्रति किलो झाली आहे. तर पीएनजी 41रुपये प्रति किलोवर पोहोचणार आहे. राज्य सरकारने व्हॅट कमी केल्यामुळे सीएनजीचे दर कमी झाले होते. मात्र आता महानगर गॅस लिमिटेडने दर वाढवल्याने याचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
व्हॅट कमी केल्याचा फायदा नाहीच?
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर सीएनजीमध्ये सहा रुपयांची तर पीएनजीमध्ये साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. मात्र असे असताना आता होणारी दरवाढमुळे सामान्य वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. व्हॅट कमी केल्याचा फायदा नाहीच?असा सवाल नागरिकांना पडला आहे. कारण व्हॅट कमी करण्याआधी असणारे सीएनजी आणि पीएनजीच्या दरापेक्षा जास्त दर आज मध्यरात्रीपासून द्यावा लागणार आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण
राज्य सरकारने सीएजीवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा आर्थिक ताण राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. व्हॅट कमी झाल्याने राज्यात सीएनजीचे दर सहा रुपयांनी तर पीएनजीचे दर साडेतीन रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र राज्याने व्हॅट कमी करताच कंपन्यांकडून दर वाढवण्यात आल्याने नागरिकांना स्वस्त सीएनजीचा आनंद फार काळ घेता आला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.