आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी विमानतळाचा गौरव:तब्बल 11 लाख प्रवाशांचा टप्पा पार करणाऱ्या शिर्डी विमानतळाचा गौरव

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून चांगली कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. या कामगिरीबद्दल ‘बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आऊटलूक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ या श्रेणीत केंद्र सरकारकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला पारितोषिक मिळाले आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. परिवहनमंत्री अनिल परब, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विमान पत्तनच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग आदी उपस्थित होते.

शिर्डी विमानतळाने ३० एप्रिल २०२२ अखेरपर्यंत ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. शिर्डी येथून कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बंगळुरू, चेन्नई व दिल्ली येथे पाठवण्यात येत आहेत. आतापर्यंत शिर्डीवरून कार्गोने १ लाख ७० हजार किलोपर्यंतचा शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला, अशी माहिती या वेळी देण्यात आली. समृद्धी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात विमान वाहतुकीस चालना मिळेल त्यामुळे या भागातील प्रस्तावित प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेली कार्यवाही, अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढवा, पालघर येथे सॅटेलाइट विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...