आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले:विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांचा अभिमान

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळांसह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्रीशक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑइलच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रात्री गेटवे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित विशेष मल्टी मीडिया प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास, महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, जी-२० महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, विपणन संचालक व्ही. सतीशकुमार, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदन, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. बी. एन. पाटील, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, अमृता फडणवीस आदी उपस्थित होते. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...