आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:पंतप्रधान मोदींनी ‘त्या’ वादग्रस्त विधानावर खुलासा करावा; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात काँग्रेसकडून कॅम्प येथे ‘शहिदों को सलाम दिवस’ पाळण्यात आला. - Divya Marathi
पुण्यात काँग्रेसकडून कॅम्प येथे ‘शहिदों को सलाम दिवस’ पाळण्यात आला.
  • केंद्राविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन, सीमांचे रक्षण करण्यात अपयशी : थोरात

चीन सीमेवर सातत्याने कुरापती काढत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी चीनसमोर शरणागती पत्करली. सरकारच्या या नाकर्तेपणाचा जाब विचारणासाठी तसेच २० शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले. सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार कमी पडले, असा आरोप प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तर पंतप्रधानांनी ‘त्या’ वादग्रस्त विधानावर खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

गांधी भवन येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी चव्हाण म्हणाले की, लडाखमध्ये केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे. देशहिताचा विचार करत सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल, त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य चीनला पोषक ठरले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला. चीनने मोदींच्या वक्तव्याचा पुरेपुर फायदा उठवत घुसखोरी केली नाही, असे तो जगभर सांगत सुटला आहे. पंतप्रधानांचे हे वक्तव्य काँग्रेसला मान्य नाही. पंतप्रधान कार्यालयाने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पुरेसे नसून सरकारने पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानावर खुलासा करावा.

बातम्या आणखी आहेत...