आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांची प्रतिक्रिया:पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. किती संख्याबळ आहे त्यावर आमची बैठक होणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थ पाहायला मिळत आहे. त्यावर भुजबळ बोलत होते.

आज तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. पुढे भुजबळ म्हणाले की, पुढे काय होते ते आपण बघू सरकार राहणे, पडणे या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाही. मध्यवर्ती निवडणुका लागल्या तरी आम्ही कायम तयार आहोत. मार्ग काढण्यासाठी शरद पवारांशी चर्चा करणार करू, संध्याकाळी पाच वाजता शिवसेना आमदार आणि खासदारांची देखील बैठक होणार आहे..

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत महाविकास आघाडी बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजपला पाठिंबा नाही

एकनाथ शिंदे म्हणाले की, अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही गुवाहाटीत 42 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊ जात आहोत.